Posts

Showing posts from March, 2026

Your Team's Weekly Calender

 तुम्ही एक चॅनेल पार्टनर आहात? आणि सध्या तुमच्या कडे १० लोकांची टीम पण आहे? चला तर मग जाणून घेऊया की तुमच्या टीम चे आठवड्याचे काय Schedule असावे... १.  पहिला दिवस - मागील आठवड्यातील राहिलेल्या कामांची लिस्ट तयार करणे म्हणजेच राहिलेले कॉल्स, फॉलोअप इत्यादी, एखाद्या लोकेशन मधील सर्व प्रोजेक्ट्स ची लिस्ट तपासून बघणे. २. दुसरा दिवस - Social Media वापरून काही गोष्टी तयार करणे आणि पोस्ट करणे, टीम बरोबर बसून सर्व क्लाएंट चा आढावा घेणे. ३. तिसरा दिवस - टीम मध्ये २-३ लोकांनी एकत्र ग्रुप मध्ये Project Orientation साठी जाणे  ४. चौथा दिवस - प्रोजेक्ट डिटेल्स साठी एक फाइल बनवणे जिथे तुम्हाला सर्व प्रोजेक्ट्स एका शीट मध्ये मिळू शकतील, काही कंपनी मध्ये संपर्क करून त्यांच्या HR मॅनेजर बरोबर मीटिंग ठरवणे ५. पाचवा दिवस - सर्व लीड्स वर कॉलिंग करून त्यांची साइट Visit Line Up करा आणि त्या सर्व लीड्स त्या त्या प्रोजेक्ट  Tag करून ठेवा  ६. सहावा दिवस - आज पूर्ण पणे मार्केट मध्ये थांबा आणि जास्तीत जास्त Site Visits करा, क्लाएंट बरोबर फेस टू फेस मीटिंग करा अशा दिनचर्येने तुमच...

Cold Calling And Lead Generation

 काही दिवसांपूर्वी आपण Cold Calling चा साधारण एक Ratio बघितला आता आज आपण बघू की Cold Calling कसे करावे  Step -1 Study Your Client साधारण हे काम करताना आपल्याकडे क्लाएंट चे नाव आणि नंबर या दोन्ही गोष्टी असतात तर मग तो नंबर एकदा True Caller वर टाकून बघा तिथे कदाचित आपल्याला क्लाएंट चे नाव आणि Email Id दिसू शकतो त्यावरून गुगल वर त्याचे नाव शोधा आणि या मुळे कदाचित त्याचे आपल्याला Social Media वरील प्रोफाइल मिळू शकते ते उघडून थोडा फार क्लाएंट बद्दल अंदाज घ्या आणि मग कॉल करा  Step -2 WhatsApp Vs Call प्रत्येक वेळी कॉल आधीच केला पाहिजे असे पण नाही त्याच्या Whatsapp वर तुम्ही एक छान मेसेज पाठवू शकता आणि मग कॉल वर बोलू शकता, कदाचित या मुळे कॉल वर बोलताना क्लाएंट बऱ्यापैकी Comfortable असेल  Step -3 Respect His Decision तुम्ही जर क्लाएंट ला घराच्या Requirement साठी कॉल केला असेल आणि जर का तो तुम्हाला नाही असे बोलला तर त्याच्या उत्तराचा Respect करा आणि फोन बंद करा. Step -4 Talk To Then As You Already Knows Him हा फार महत्वाचा मुद्दा आहे, जर आपल्याला पण कोणी Unknown नंबर वरून कॉल...

Wonder Of Sales In Real Estate

जेव्हा एखादा एजंट सेल करणे थांबवतो तेव्हा तो जास्तीत जास्त डील्स Close करतो..... आता हे ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की हा माणूस काय बोलत आहे, वेडा आहे का हा माणूस आणि असे बरेच प्रश्नचिन्ह तुम्हाला पडले असतील, पण हीच तर रिअल इस्टेट Sales मधली Beauty आहे कसं ते जाणून घेऊया चला... रिअल इस्टेट मध्ये ग्राहक खरेदी करून घेण्यासाठी उत्सुक नसतात, त्यांना त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेताना असे वाटायला नको की कोणीतरी त्याच्या डोक्यावर बसून हा निर्णय घेण्यास भाग पाडत आहे त्यामुळे ग्राहकाला जर तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतले असेल आणि योग्य तो प्रोजेक्ट दाखवला तर ग्राहक लवकर निर्णय घेऊ शकतात.. म्हणूनच ग्राहकाला ओळखा, त्याला काय पाहिजे ते व्यवस्थित ऐका आणि मग असे 1-2 प्रोजेक्ट दाखवा जिथे तुम्हाला उगाच बडबड करून हा प्रोजेक्ट सगळ्यात सुंदर आहे, किंवा याची कनेक्टिव्हिटी खूप मस्त आहे, किंवा असा Layout तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच प्रोजेक्ट ला मिळणार नाही या सेल्स गोष्टी बोलायची गरज नाही पडणार  आणि तुमच्या ग्राहकाला पण लगेच कळून चुकते की तुम्ही खरंच त्याच्या गरजेनुसार त्याला प्रोजेक्ट दाखवत आ...

More Talking Means Best Real Estate Sales Skills??

In Real Estate We Think That A Person Talks More Can Sell More..But Unfortunately It's Totally Wrong... For Me Of You Want To Increase Real Estate Sales You Must Be Good Listener. Yes, You Read Write... Listening Is The Most Powerful Tool In Real Estate Sales Because If I Don't Understand The Exact Requirement Of Clients Then I Can't Give Him The Best Option From My End And To Understand His Requirements You Should Listen Him First Very Carefully. As Per My Experience In This Field Your Sales Is 75% Depends On Your Listening Skills And 25% On Your Communication Skills  If You Like This Blog Write Yes In The Comment Box  Thanks 

Cold Calling Series Part -1

 रिअल इस्टेट मार्केट मध्ये काम करताना Data हा खूप महत्वाचा घटक आहे, ज्याच्या कडे जास्त Data त्याच्याकडे जास्त बिझनेस अशी एक मेंटॅलिटी तयार झाली आहे, अगदी बरोबर आहे पण सगळेच जण Data विकत घेऊन काम करू शकतील असे नाही काही जण Cold Data वर काम करून त्यावर लीड्स आणायचा प्रयत्न करतात पण त्या मध्ये फारसे यश मिळत नाही याचे मूळ कारण म्हणजे या Data वर काम कसे करायचे ते माहिती नसते  आज आपण या ब्लॉग मध्ये Cold Calling करायची एक पद्धत बघूया  Cold Calling Ratio Discription Total Calling On Daily Basis -200 Nos Total Daily Connected Calls - 65/70 Total Interested Prospects - 12/15 Total Site Visit Prospects - 5 Site Visit And Conversion - 1 हा सर्व साधारण Ratio असून या मध्ये प्रत्येक गोष्टीचे प्रमाण 5-10% इकडे तिकडे होऊ शकते हे फक्त तुम्हाला एक अंदाज यावा की जर तुम्ही Cold Calling करत असाल तर तुम्हाला किती काम करणे गरजेचे आहे..  

Something Out Of The Box...

एक एजंट म्हणून सगळे जण बऱ्यापैकी सारखे काम करत असतात जसे की, FB पोस्ट करणे, आलेल्या फ्लॅट ची माहिती सांगून त्याची विक्री करणे, एखाद्या प्रोजेक्ट ची जाहिरात करणे, पण या पलीकडे जाऊन जर का विचार केलात आणि तुम्ही खाली दिलेल्या कामां पैकी अर्धी कामे जरी करु शकलात तरीसुद्धा तुम्ही तुमच्या Business मध्ये जास्त चांगले पैसे कमवू शकता आणि त्या पेक्षा महत्वाचे तुम्ही जास्त काळ हा Business चालवू शकता.. १. IT पार्क मधील HR मॅनेजर ला जाऊन भेटणे. २. तुमचे अकाऊंट ज्या बँक मध्ये आहे त्या बँकेच्या जवळपास असलेल्या सर्व ब्रँच मध्ये जाऊन तिथल्या Manager बरोबर चांगले संबंध ठेवणे ३. जे काही मोठे मोठे स्पोर्ट्स क्लब आहेत तिथे जाऊन त्यांच्या Management बरोबर संबंध वाढवणे  ४. हॉटेल्स, मॉल्स या ठिकाणी तुमच्या जाहिराती साठी काही वाव मिळत असेल तर त्या साठी प्रयत्न करणे ५. अधून मधून पॅम्पलेट डिस्ट्रिब्यूशन करावे त्यामुळे लोकांना आपण आठवणीत राहतो ६. एखादा कुठला ही मोठा उत्सव असेल तर तिथे काही जाहिरात करता येईल का त्यावर लक्ष देणे ७. MIDC मध्ये जाऊन तिथल्या कंपनी मध्ये जाऊन भेट देणे  ८. काही मोठे मोठे Develo...

How To Show Sample Flat On Project?

 Here Are Some Tips On How To Show Sample Flat To Your Valuable Client At Project. 1. Sample Flat दाखवताना तुमच्या क्लाएंट च्या मागे मागे प्रत्येक रूम मध्ये जाऊ नका. तुमच्या क्लाएंट ला त्या फ्लॅट मध्ये एक फील येऊ दे 2. प्रत्येक रूम ही घरातल्या वेगवेगळ्या माणसासाठी उपयुक्त असते त्यामुळे त्या त्या रूम मध्ये त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीशी संवाद साधा, उदाहरणार्थ kitchen असेल तर कुटुंबातील बाई माणसाशी त्या किचन बद्दल बोला, Kids Bed असेल तर त्यांच्या मुलांना ती बेडरूम किती मस्त आहे ते सांगा  3. Sample Flat दाखवताना Developer, Location, Pricing यावर आजिबात चर्चा करू नका कारण भले तुम्ही ते फ्लॅट खूप वेळा पाहिला असेल पण तुमचा क्लाएंट तो फ्लॅट पहिल्यांदाच पाहत आहे त्यामुळे त्याला त्या फ्लॅट मधील प्रत्येक कॉर्नर चा आनंद घेऊ दे. कदाचित या गोष्टी आपल्याला माहित असतात पण आपण करत नसतो, चला तर मग एकदा या गोष्टी करून तर बघा नक्की तुमच्या Sales मध्ये फरक पडेल  अशाच छोट्या छोट्या टिप्स साठी माझे ब्लॉग फॉलो करा.

Real Estate पाट्या - भाग ८

काही काही रिअल इस्टेट एजंट लोकांचा कॉन्फिडन्स बघण्याजोगा असतो, हातात एकही कागद नसेल तरी त्या प्लॉट बद्दल सगळी माहिती सांगायचे धाडस करतात,.प्रोजेक्ट बद्दल फक्त ऐकून ते समोरच्याला असे Explain करतात जसे काही रोज प्रोजेक्ट वरच बसलेले असतात असे वाटते अशाच लोकांसाठी सुचलेली एक पाटी.. "तुम्हाला जर घर पाहिजे असेल तर फक्त ५ गोष्टी करा, पहिली म्हणजे मला एक कॉल करा, मग बाकीच्या ४ मी बघतो"

थोडे भूगाव बद्दल

 भूगाव कोथरूड आणि बावधन यांच्या पासून पुढे तयार झालेला भाग म्हणजे भूगाव,साधारण 10 वर्षापूर्वी हा भाग एक खेडेगाव म्हणून गणला जायचा जो पुढे पिरंगुट आणि कोकणात जोडला जातो. कोथरूड पूर्ण होत असताना आधी बावधन भाग तयार झाला आणि आता काही वर्षांपासून भूगाव येथे लोकांचे येणे जाणे वाढले, अर्थातच तिथल्या हॉटेल्स मुळे, हळू हळू तिथे एक एक प्रतिष्ठित बिल्डर्स आपले प्रोजेक्ट्स घेऊन येयला लागले आणि या भागाला उत्तम असा एक लूक आला.. आधी परांजपे आणि स्काय आय यांनी तिथे सगळ्यात मोठ्या टाउनशिप आणल्या आणि मग सुरुवात झाली ती चित्र बदलायला, ज्या भागाला लोकं दुर्लक्षित करत आले आज तोच भाग एवढा बदलून गेला की आता कदाचित काहीना पश्र्चाताप होत असेल भूगाव मध्ये तुमचे स्वप्नातले घर का घ्यावे? १. काही वर्षांनी येणारे मेट्रो स्टेशन (चांदणी चौक येथे) २. तयार होत असलेला मोठा रस्ता जो मांडगाव ला जोडला जातो ३. आत्ता असलेले आणि भविष्यात येणारे नामांकित बिल्डर्स ४. हिंजवडी फेज ३ ला मिळणारी उत्तम अशी कनेक्टिव्हिटी ५. हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस, हे सर्व काही प्रत्येक प्रोजेक्ट च्या हाकेच्या अंतरावर ६. लाईफस्टाईल शोरुम, फेमस ब्...

Real Estate पाट्या - भाग ७

  इस्टेट एजंट आणि मार्केटिंग यांचे नाते म्हणजे असे असते ना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना..फक्त तुझं आणि माझं या मध्ये जेव्हा तिसरा येतो ना तिथेच गडबड होते  आता बघा ना बरेच एजंट्स स्वतःच्याच क्लाएंट च्या Requirement ची एवढी बोंब मारतात आणि मग त्रास करून घेतात या वरूनच सुचलेली आजची माझी पाटी "बऱ्याच एजंट लोकांना स्वतःच्याच क्लाएंट ची Requirement सोशल मीडिया वर सांगून मार्केटींग केल्यासारखे वाटते"

First 30 Days In Real Estate

 जर का तुम्ही सध्याच रिअल इस्टेट मार्केट मध्ये कामाला सुरूवात केली असेल किंवा तुम्हाला या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे, तर मग हा ब्लॉग नक्कीच तुम्हाला उपयोगी येईल मी सारंग साठे घेऊन येत आहे फक्त तुमच्या साठी एक लाइव्ह सेशन जिथे तुम्हाला मी सांगणार आहे की पहिले ३० दिवस रिअल इस्टेट मध्ये काम सुरू केल्यावर नक्की काय करायचे  हा सेशन तब्बल २ तासांचा असून त्या मध्ये आपण खालील गोष्टीवर चर्चा करणार आहोत  1. How To Start. 2. Choosing A Segment. 3. Market Survey. 4. Meetups. 5. Data Calling And Followups. 6. Social Media Presence. सेशन दिवस - शुक्रवार २४ एप्रिल २०२६ वेळ - सकाळी ११-१ कोण कोण करू शकते - नव्याने काम सुरू केलेले, पुढे जाऊन काम करू इच्छिणारे, काम करत असलेले सेशन फी - ₹१९९/- फक्त तुमचे नाव आत्ताच नोंदवा कारण फक्त पहिल्या २० लोकांसाठीच हा सेशन उपलब्ध आहे नाव नोंदणीसाठी साठी -9175014458 या नंबर वर First 30 Days असे लिहून व्हॉट्सॲप करा

Real Estate पाट्या - भाग ६

आज बऱ्याच टाउनशिप मध्ये काही काही बिल्डर्स लोकांना पार्किंग लोकांना कसे नेमायचे या वर खूप मेहनत करावी लागते, काही जण २ -२ पार्किंग विकत घ्यायच्या गोष्टी करतात तर काही लोकांना ओपन पार्किंग घ्यावे लागते  याच पार्किंग वर आज मला एक सुचलेली पाटी "फ्लॅट किती ही मोठा घेतला तरी मिळणाऱ्या पार्किंग मध्ये दोनच गाड्या मावतात बरका"

Real Estate पाट्या - भाग ५

आजकाल बिल्डर्स बऱ्याच प्रोजेक्ट्स मध्ये जोडी फ्लॅट्स नावाची एक कॉन्सेप्ट चालवतात.. या मध्ये दोन शेजार शेजारचे फ्लॅट एकत्र करून मोठा कार्पेट लोकांना देतात, खरं तर हे केल्या नंतर बऱ्याच वेळा Layout चांगला होत नाही पण जिथे पहिल्यापासून जर का या कॉन्सेप्ट ची सोय केली असेल तर ते फ्लॅट Layout छान दिसतात आणि लोकांना पुरेसे आवडतात पण या वरच सुचलेली एक पाटी "दोन फ्लॅट एकत्र करून राहणे म्हणजे हिला आणि तिला एकत्र आणण्यासारखे आहे" बघा पटतंय का??

Real Estate पाट्या - भाग ४

 आज काल पुण्यात टाउनशिप चा मोठा ट्रेंड आला आहे जवळपास सर्व Developers ज्या मोठ्या मोठ्या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत तिथे टाउनशिप बांधतात, अर्थातच टाउनशिप बांधताना त्यांनी सर्व बाबींचा विचार केलाच असतो जसे की तिथले Roads, light, Water Supply , Amenities आणि इतर काही.. तरी पण एखाद्या Client ला आपण एजंट या टाउनशिप दाखवायला नेतो तेव्हा त्याच्या प्रश्नांवरून सुचलेली एक पाटी "इथे पाणी सगळ्या लोकांना पुरेल ना आणि काही प्रॉब्लेम येणार नाही ना, मग काय मी पण टेबल वरची Bisleri हळूच त्यांच्या पुढ्यात सरकवतो"

Real Estate पाट्या - भाग ३

 आपण बरेच क्लाएंट बघत असतो की ज्यांना मोठे फ्लॅट बघायला फार आवडते, किंवा मोठा कार्पेट सांगितला की त्यांना आवडते आणि मग काय या वर सहज सुचलेली एक पाटी  "उगाच मोठा कार्पेट पाहिजे असा हट्ट करू नका लॉकडाउन चा काळ आठवतोय ना" त्याचे काय आहे घर कधी कधी आपल्यालाच झाडावे आणि पुसावे लागते म्हणून म्हणले

Real Estate पाट्या - भाग २

 जेव्हा एखादा एजंट त्याच्या client ला बरेच प्रोजेक्ट्स दाखवतो आणि त्या नंतर पण जेव्हा तो Client म्हणतो की आणखी काही ऑप्शन आहे का त्या वर सुचलेली एक पाटी "काही क्लाएंट ना बरेच प्रोजेक्ट्स बघून Window 🪟 Shopping 🛍️ करायला खूप आवडते"

Real Estate पाट्या - भाग १

रिअल इस्टेट मार्केट मध्ये काम करताना एजंट म्हणून बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतात, काही बिल्डर च्या, काही क्लाएंट च्या, तर काही एजंट च्या सुद्धा  याच गोष्टी थोड्या विनोदी पद्धतीने मांडायचा माझा एक प्रयत्न आहे, चला तर मग आजच्या ब्लॉग ची सुरुवात करू उंच उंच टॉवर वरून आज बरेच बिल्डर उंच उंच टॉवर्स बांधतात आणि खूप साऱ्या लोकांना आकर्षित करतात तर मग याच Sutuation ला पकडून आजची माझी पहिली Real Estate पाटी  " काही लोकांना जास्तीत जास्त वरच्या फ्लोअर वर फ्लॅट घेऊन ढगात राहायला आवडते"