Something Out Of The Box...

एक एजंट म्हणून सगळे जण बऱ्यापैकी सारखे काम करत असतात जसे की, FB पोस्ट करणे, आलेल्या फ्लॅट ची माहिती सांगून त्याची विक्री करणे, एखाद्या प्रोजेक्ट ची जाहिरात करणे, पण या पलीकडे जाऊन जर का विचार केलात आणि तुम्ही खाली दिलेल्या कामां पैकी अर्धी कामे जरी करु शकलात तरीसुद्धा तुम्ही तुमच्या Business मध्ये जास्त चांगले पैसे कमवू शकता आणि त्या पेक्षा महत्वाचे तुम्ही जास्त काळ हा Business चालवू शकता..

१. IT पार्क मधील HR मॅनेजर ला जाऊन भेटणे.
२. तुमचे अकाऊंट ज्या बँक मध्ये आहे त्या बँकेच्या जवळपास असलेल्या सर्व ब्रँच मध्ये जाऊन तिथल्या Manager बरोबर चांगले संबंध ठेवणे
३. जे काही मोठे मोठे स्पोर्ट्स क्लब आहेत तिथे जाऊन त्यांच्या Management बरोबर संबंध वाढवणे 
४. हॉटेल्स, मॉल्स या ठिकाणी तुमच्या जाहिराती साठी काही वाव मिळत असेल तर त्या साठी प्रयत्न करणे
५. अधून मधून पॅम्पलेट डिस्ट्रिब्यूशन करावे त्यामुळे लोकांना आपण आठवणीत राहतो
६. एखादा कुठला ही मोठा उत्सव असेल तर तिथे काही जाहिरात करता येईल का त्यावर लक्ष देणे
७. MIDC मध्ये जाऊन तिथल्या कंपनी मध्ये जाऊन भेट देणे 
८. काही मोठे मोठे Developers आहेत जे NSE मध्ये Listed आहेत त्यांचे जर का Stocks घेता आले तर ते घेत राहणे

वरील सर्व गोष्टी केल्या मुळे तुमच्या दारात ग्राहकांची भली मोठी लाईन लागणार नाही पण तुम्ही आज या ओळखींमुळे जे पेराल ते नक्कीच तुमच्या वर्षानुवर्षे कामी येईल ज्या मुळे तुम्हाला Smooth Business करता येईल. बाकी तुम्ही सध्या जे करत आहात ते चालूच ठेवायचे आहे, वरील गोष्टींसाठी मात्र आठवड्यातून एक दिवस तरी काढा.

Comments

Popular posts from this blog

Real Estate Calling Tips

Project Checklist

Quality As An Agent