Your Team's Weekly Calender
तुम्ही एक चॅनेल पार्टनर आहात? आणि सध्या तुमच्या कडे १० लोकांची टीम पण आहे?
चला तर मग जाणून घेऊया की तुमच्या टीम चे आठवड्याचे काय Schedule असावे...
१. पहिला दिवस - मागील आठवड्यातील राहिलेल्या कामांची लिस्ट तयार करणे म्हणजेच राहिलेले कॉल्स, फॉलोअप इत्यादी, एखाद्या लोकेशन मधील सर्व प्रोजेक्ट्स ची लिस्ट तपासून बघणे.
२. दुसरा दिवस - Social Media वापरून काही गोष्टी तयार करणे आणि पोस्ट करणे, टीम बरोबर बसून सर्व क्लाएंट चा आढावा घेणे.
३. तिसरा दिवस - टीम मध्ये २-३ लोकांनी एकत्र ग्रुप मध्ये Project Orientation साठी जाणे
४. चौथा दिवस - प्रोजेक्ट डिटेल्स साठी एक फाइल बनवणे जिथे तुम्हाला सर्व प्रोजेक्ट्स एका शीट मध्ये मिळू शकतील, काही कंपनी मध्ये संपर्क करून त्यांच्या HR मॅनेजर बरोबर मीटिंग ठरवणे
५. पाचवा दिवस - सर्व लीड्स वर कॉलिंग करून त्यांची साइट Visit Line Up करा आणि त्या सर्व लीड्स त्या त्या प्रोजेक्ट Tag करून ठेवा
६. सहावा दिवस - आज पूर्ण पणे मार्केट मध्ये थांबा आणि जास्तीत जास्त Site Visits करा, क्लाएंट बरोबर फेस टू फेस मीटिंग करा
अशा दिनचर्येने तुमच्या टीम कडून फक्त कामच नाही पण एक वेगळी एनर्जी Maintain केली जाईल ज्या मुळे ते अधिक उत्सुकतेने काम करतील, त्यांच्या Knowledge मध्ये भर पडेल आणि त्यामुळे ते क्लाएंट शी अधिक आत्मविश्वासाने बोलू शकतील.
बाकी सर्व भीती काढून टाकून तुम्ही तुमच्या टीम ला जर व्यवस्थित अपडेट केले तर ते लोक तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत हे लक्षात ठेवा
Comments
Post a Comment