Wonder Of Sales In Real Estate
जेव्हा एखादा एजंट सेल करणे थांबवतो तेव्हा तो जास्तीत जास्त डील्स Close करतो.....
आता हे ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की हा माणूस काय बोलत आहे, वेडा आहे का हा माणूस आणि असे बरेच प्रश्नचिन्ह तुम्हाला पडले असतील, पण हीच तर रिअल इस्टेट Sales मधली Beauty आहे कसं ते जाणून घेऊया चला...
रिअल इस्टेट मध्ये ग्राहक खरेदी करून घेण्यासाठी उत्सुक नसतात, त्यांना त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेताना असे वाटायला नको की कोणीतरी त्याच्या डोक्यावर बसून हा निर्णय घेण्यास भाग पाडत आहे त्यामुळे ग्राहकाला जर तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतले असेल आणि योग्य तो प्रोजेक्ट दाखवला तर ग्राहक लवकर निर्णय घेऊ शकतात..
म्हणूनच ग्राहकाला ओळखा, त्याला काय पाहिजे ते व्यवस्थित ऐका आणि मग असे 1-2 प्रोजेक्ट दाखवा जिथे तुम्हाला उगाच बडबड करून हा प्रोजेक्ट सगळ्यात सुंदर आहे, किंवा याची कनेक्टिव्हिटी खूप मस्त आहे, किंवा असा Layout तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच प्रोजेक्ट ला मिळणार नाही या सेल्स गोष्टी बोलायची गरज नाही पडणार
आणि तुमच्या ग्राहकाला पण लगेच कळून चुकते की तुम्ही खरंच त्याच्या गरजेनुसार त्याला प्रोजेक्ट दाखवत आहात की कुठे तरी तुम्हाला जास्त कमिशन मिळणार म्हणून एखादे प्रोजेक्ट दाखवत आहात. ज्या वेळी ग्राहकाला दबाव जाणवतो तेव्हाच तो निगेटिव्ह झालेला असतो
म्हणूनच मी बोललो की रिअल इस्टेट मध्ये सेल्स जास्त बोलून होत नाही, सेल्स तेव्हा वाढतो जेव्हा क्लाएंट वर दबाव कमी असतो आणि त्याला असे वाटते की हा निर्णय मी स्वतः घेत आहे
अशाच बहुमूल्य गोष्टी जाणून घेण्यासाठी मला फॉलो करा
Sanchit Gruhashodh
Real Estate Advisor
Pune
8446018446
Comments
Post a Comment