Cold Calling And Lead Generation

 काही दिवसांपूर्वी आपण Cold Calling चा साधारण एक Ratio बघितला आता आज आपण बघू की Cold Calling कसे करावे 

Step -1 Study Your Client

साधारण हे काम करताना आपल्याकडे क्लाएंट चे नाव आणि नंबर या दोन्ही गोष्टी असतात तर मग तो नंबर एकदा True Caller वर टाकून बघा तिथे कदाचित आपल्याला क्लाएंट चे नाव आणि Email Id दिसू शकतो त्यावरून गुगल वर त्याचे नाव शोधा आणि या मुळे कदाचित त्याचे आपल्याला Social Media वरील प्रोफाइल मिळू शकते ते उघडून थोडा फार क्लाएंट बद्दल अंदाज घ्या आणि मग कॉल करा 

Step -2 WhatsApp Vs Call

प्रत्येक वेळी कॉल आधीच केला पाहिजे असे पण नाही त्याच्या Whatsapp वर तुम्ही एक छान मेसेज पाठवू शकता आणि मग कॉल वर बोलू शकता, कदाचित या मुळे कॉल वर बोलताना क्लाएंट बऱ्यापैकी Comfortable असेल 

Step -3 Respect His Decision

तुम्ही जर क्लाएंट ला घराच्या Requirement साठी कॉल केला असेल आणि जर का तो तुम्हाला नाही असे बोलला तर त्याच्या उत्तराचा Respect करा आणि फोन बंद करा.

Step -4 Talk To Then As You Already Knows Him

हा फार महत्वाचा मुद्दा आहे, जर आपल्याला पण कोणी Unknown नंबर वरून कॉल करून हॅलो सारंग सर बोलत आहात का ( इथे मी माझे नाव टाकले आहे उदाहरण म्हणून)असा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला हे कळते की ती व्यक्ती अनोळखी आहे पण हेच जर का मला कोणी फोन करून हॅलो सारंग सर कसे आहात तुम्ही असे विचारतो तेव्हा मला एक विचार येतो की ही व्यक्ती आपल्याला ओळखते आणि मग मी त्या व्यक्तीशी Smooth Discussion करू शकतो.

तेव्हा तुमच्या कडे जर client चे नाव असेल तर त्या नावानेच फोन करा याचा नक्की फरक पडतो.

अशाच आणखी गोष्टी आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बघू. 

तो पर्यंत वरील गोष्टी एकदा करू तर बघा


Comments

Popular posts from this blog

Real Estate Calling Tips

Project Checklist

Quality As An Agent