Real Estate Calling Tips

 आज एका रिअल इस्टेट एजंट साठी कॉलिंग हा सगळ्यात मोठा भाग आहे असे म्हणतात. पण हेच कॉलिंग करताना जर आपण काही गोष्टी बोलायच्या टाळल्या तर आपले कॉलिंग व्यवस्थित होऊ शकते आणि त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात त्यासाठीच मी आज तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्या व्यवस्थित वाचा 

1. कॉलिंग करताना आपल्या कडे शक्यतो क्लाएंट चे नाव आणि नंबर दोन्ही असते त्यामुळे कॉल उचलल्यावर थेट त्या व्यक्तीचे नाव घेऊन बोलले तर तो क्लाएंट तुमच्या शी व्यवस्थित आणि आदरार्थी बोलेल.

2. एखाद्या प्रोजेक्ट बद्दल माहिती देण्या ऐवजी जर तुम्ही त्या प्रोजेक्ट च्या आजुबाजूच्या लोकेशन बद्दल थोडी जास्त माहिती देऊ शकलात तर उत्तम.

थोडक्यात तिथल्या कनेक्टिव्हिटी, Future Development, Current Development बद्दल बोलले पाहिजे.

3. एकदा क्लाएंट ला लोकेशन पटले की त्याला तिथल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती देऊ शकता आणि प्रोजेक्ट वर येण्यासाठी पण क्लाएंट लगेच तयार होऊ शकतात. 

4. प्रत्येक प्रोजेक्ट चे काही वैशिष्ट असते त्याचा अभ्यास करून क्लाएंट ला कुठल्या मार्गाने बोलवायचे, कुठल्या वेळेत बोलवायचे या बद्दल तुम्ही अभ्यास करून त्याला तसे सांगू शकता.

5. ज्या दिवशी त्याने प्रोजेक्ट वर येण्याचे ठरवले असेल त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या कडून वेळ पक्की करा आणि एक तसा मेसेज पण पाठवू शकता.

6. आजकाल बऱ्याच ठिकाणी 1.5/2.5/3.5/4.5 BHK घरे आहेत त्या प्रकारच्या घरांना तुम्ही वेगळ्या प्रकारे बोलू शकता. 

उदाहरणार्थ -2.5BHK साठी तुम्ही स्मार्ट 3 BHK किंवा 2 BHK With One Extra Small Room असे बोलू शकता त्यामुळे क्लाएंट Positive Approach ने बघतो.

7. पहिल्याच कॉल वर जेवढी जास्तत जास्त माहिती तुम्हाला क्लाएंट बद्दल घेता येईल, त्याच्या Requirement बद्दल कळेल तेवढे चांगले असते.

8. क्लाएंट शी बोलताना आधी पूर्ण त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि मग तुम्ही बोला म्हणजे तो पण तुमचे म्हणणे पूर्ण ऐकून घेईल.

अशाच काही बहुमूल्य टिप्स करता आमच्या बरोबर जोडलेले राहा 

Sanchit Gruhashodh 

Real Estate Advisor 

Pune 


Comments

Popular posts from this blog

Project Checklist

Quality As An Agent