नक्की Carpet Area म्हणजे काय??
आज काल सगळे बिल्डर कार्पेट एरिया वर खूपच नाराज दिसतात, कारण आज १० पैकी ९ प्रोजेक्ट्स मध्ये खूपच छोटा कार्पेट एरिया असतो, आणि किंमत मात्र खूप वाटते
पुण्याच्या वाढत्या पसाराकडे लक्ष दिले तर आज काल मिळणाऱ्या जमिनी आणि त्यावर जास्तीत जास्त घरे बांधून देणे या सगळ्या प्रकारामुळे पुण्याची पण लवकर मुंबई होईल असे म्हणतात
तरी सुद्धा काही काही बिल्डर्स अमुक एरिया मधील सर्वात मोठा कार्पेट मिळवा अशी जाहिरात करून लोकांना आकर्षित करण्यात सफल होतात आणि आपण पण जिथे ६००-६५० कार्पेट ऐवजी 2 BHK चा ८००+ कार्पेट दिसतो तिथे आकर्षित होतो.
मुळात कार्पेट एरिया म्हणजे नक्की काय हे जर तुम्हाला समजले तर तुम्ही त्यावर व्यवस्थित निर्णय घेऊ शकता.
RERA नियमानुसार आता तुम्हाला दिले जाणारे टेरेस, किंवा बाल्कनी हे सुद्धा १००% कार्पेट मध्ये पकडले जाते हे लक्षात ठेवा त्यामुळं जर का 800+ कार्पेट ला 100 Sqft जरी बाल्कनी दिल्या तरी फक्त फ्लॅट तुमचा 700 Sqft एवढाच राहतो हे लक्षात घ्या
तसेच जर एखादा बिल्डर छोट्या फ्लॅट ला बेडरूम 11*12 ची देत असेल आणि मोठ्या कार्पेट मध्ये पण मला तीच size मिळत असेल तर काय फायदा?
त्यामुळे नुसत्या कार्पेट एरिया कडे न बघता तुम्ही त्या फ्लॅट च्या Room Sizes बघितल्या पाहिजेत
एक एजंट म्हणून पण क्लाएंट तुम्हाला बोलतात की कार्पेट फार छोटा आहे आणि किंमत जास्त वाटत आहे तेव्हा तुम्ही या मुद्द्यावर बोलू शकता, त्यांना तुम्ही त्यांनी जो काही मोठा फ्लॅट बघितला असेल त्याच्या Room Sizes आणि तुम्ही दाखवत आहात त्याच्या Room Sizes Compare करून दाखवू शकता
कार्पेट आणि Pricing चे गणित मी माझ्या आधीच्या ब्लॉग मध्ये दिले आहे ते बघायचे असेल तर खालच्या लिंक वर क्लिक करा
https://knowingrealestate26.blogspot.com/2026/01/carpet-and-pricing.html
अशाच उपयुक्त माहितीसाठी माझ्याबरोबर जोडून रहा
Sanchit Gruhashodh
Real Estate Advisor
Pune
Comments
Post a Comment