या गोष्टी एजंट लोकांनी जरूर कराव्यात

आम्ही बऱ्याच क्लाएंट ना बरेच प्रोजेक्ट दाखवतो पण डील होत नाहीत

आम्ही लीड्स साठी खूप पैसे खर्च करतो पण पाहिजे तशा लीड्स मिळत नाहीत

आमचे क्लाएंट नंतर परस्पर जाऊन फ्लॅट घेतात 

अशा गोष्टी आपण रोज कुठल्या ना कुठल्या एजंट कडून ऐकतो पण त्याच्या मुळाकडे आपण लक्षच देत नाही 

रिअल इस्टेट क्षेत्रात काम करण्या साठी नुसते पैसे लावून लीड्स मिळत नाही तर मार्केट मध्ये तुमचे एक वेगळे अस्तित्व करावे लागते 

कुठल्या गोष्टी तुम्ही सातत्याने केल्या पाहिजेत?

१. तुमच्या सारख्या एजंट लोकांना भेटणे 

२. प्रोजेक्ट वर जाऊन तिथल्या सेल्स टीम बरोबर चर्चा करणे 

३. तुमचे क्लाएंट बनू शकतात अशा लोकांना भेटणे 

४. ज्यांना तुम्ही आधीच फ्लॅट विकला आहे त्यांना भेटणे 

५. सोशल मीडिया वर रोज काही ना काहीतरी पोस्ट करणे 

( प्रोजेक्ट ची माहिती, बुकिंग केले असेल तर त्याचे फोटो किंवा व्हिडिओ, 

या गोष्टींमुळे तुमचा प्रसार तर वाढेलच पण त्याबरोबर लोक तुम्हाला लक्षात पण ठेवतील.

अशाच काही टिप्स साठी आमच्या बरोबर रहा 

Sanchit Gruhashodh 

Real Estate Advisor 

Pune


Comments

Popular posts from this blog

Real Estate Calling Tips

Project Checklist

Quality As An Agent